---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । २५ फेब्रुवारी २०२३। पाणीपुरी, शेवपुरी, रगडापॅटिस यासारखे पदार्थ आपण बाहेर खात असतो. याचप्रकारे, कच्ची दाबेली सुद्धा बाजारात अगदी १५ – २० रुपयांपर्यंत मिळते. गावराणी तुपातली दाबेली, चीझ दाबेली, साधी दाबेली असे अनेक प्रकार यामध्ये आपल्याला पहायला मिळतात. तुम्ही ही दाबेली घरी सुद्धा बनवू शकता. दाबेली घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
उकडलेले बटाटे (कुस्करून घ्या), आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लिंबाचा रस, मीठ, साखर, हिरवी चटणी चिंच- गूळ चटणी, डाळिंबाचे दाणे, ओलं खोबरं, नायलॉन शेव, तिखट शेंगदाणे, बटर किंवा तेल, पाव
कृती
सर्वप्रथम दाबेली मसाला करण्यासाठी घेतलेले साहित्य गरम पॅनवर मंद आचेवर भाजून घ्या. हे मसाले मिक्सरला वाटून घ्या. मग एका पॅनमध्ये तेल तापवून आलं-लसूण पेस्ट, चिरलेली मिरची, कुस्करलेले बटाटे, साखर, मीठ, लिंबाचा रस व किंचित पाणी घालून मऊ सारण तयार करा. पाव मधून कापून तेल किंवा बटर लावून अर्धे भाजून घ्या, यात एका बाजूला लसूण व एका बाजूला गोड चटणी लावा. पावाच्या एका बाजूला सारण लावून त्यावर डाळिंबाचे दाणे, शेव, तिखट दाणे, खोबरं, कोथिंबीर टाकून घ्या. पुन्हा एकदा तव्यावर थोडं बटर घालून हे सारण भरलेले पाव भाजून घ्या. गरमागरम दाबेली सर्व्ह करा.