Rupali Chakankar : रुपाली चाकणकर कडाडल्या : दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय…

Rupali Chakankar  उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी  प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे  यांच्यावर टीका केली. दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर  यांनी ‘सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा: रुपाली चाकणकर
अजित पवार महायुतीत  गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांन केले आहे. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

लोकसभा- विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार 

रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवारांनी 2023 ला निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे. अनेक चांगले निर्णय घेतले अजित पवारांनी घेतले आहे. 18 जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला आहे. तृतीयपंथीयासाठी ससूनमध्ये स्वतंत्र वॉर्ड करणार आहे. भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही. येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. प्रत्येकाची लढण्याची इच्छा असते,स्पर्धक असतात त्यामुळे खडकवासलामध्ये अनेक इच्छुक आहेत.