Dagdu got Praju : मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्याच्या लग्नापुर्वीच्या विधींच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अखेर प्रथमेश परब बोहोल्यावर चढला आहे. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा शाही विवाहसोहळा झाला आहे.
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. दोघांनी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
लग्नाचे फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले”. या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांचा खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला.
अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या प्रथमेश आणि क्षितिजा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
प्रथमेश आणि क्षितिजा यांचा खास लूक
प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. क्षितिजानं गुलाबी रंगाची साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा तर प्रथमेशनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फेटा असा लूक केला होता. लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी प्रथमेशने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. क्षितिजाच्या मोत्याच्या दागिन्यांनीही खास लक्ष वेधून घेतले होते. दोघांचा हा मराठमोळा पेहराव पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
दोघांच्या या खास लूकचं सध्या अनेकजण कौतुक करत आहेत. प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या विवाह सोहळ्याला रवी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी हजेरी लावली होती.
प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,”Finally……Lockdown love story चे Hearts, forever साठी locked” प्रथमेश आणि क्षितिजा यांनी शेअर केलेल्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रथमेश आणि क्षितिजा यांनी लग्नाआधी खास प्रीवेडिंग फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटच्या फोटोमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला.