Dahigaon : यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता . मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले. ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे . काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण दिसून आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद करण्यात आली आहेत.
अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला आहे.