---Advertisement---

सरकारची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

---Advertisement---

मुंबई : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकसानग्रस्त भागात सरकारकडून आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, “आपापल्या विभागात ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश राज्यातील सगळे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 5 हजाराची मदत तुटपुंजी होती ती 10 हजार करण्याच येईल, उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होईल. उद्यापर्यंत ९५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले असतील.”

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने चांगलाच जोर दिला आहे. यामुळे शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे नुकसानीचे तात्कळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.अशातच सरकारने पंचनामे आदेश दिल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment