डंका तो बजेगा !

वेध

– सोनाली ठेंगडी

Russia Ukraine War मागील काही वर्षांत भारताबाबत जागतिक स्तरावर कोणती चांगली गोष्ट घडली? या प्रश्नाचे उत्तर दहा वर्षांपूर्वी काही वेगळे राहिले असते. किंबहुना याचे उत्तर तेव्हा एका वाक्यात ‘फारसे विशेष काही नाही’ असे एका वाक्यात देता आले असते. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात राहणार नाही. Russia Ukraine War आता हा प्रश्नच दीर्घोत्तरी झाला आहे. कारण भारताने जागतिक स्तरावर इतके नाव कमावले आहे की, त्याविषयी बोलताना, लिहिताना शब्दही अपुरे पडतील. दहा वर्षांपूर्वी शब्द सापडत नव्हते, आता शब्द अपुरे पडताहेत. Russia Ukraine War सुरक्षा परिषदेतील स्थान असो किंवा जी-२० चे यजमानपद असो, भारताने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. यासाठी रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना काळ ही दोन उदाहरणेच पुरेशी ठरतील. कोरोना काळात मोठ्या देशांमध्येही प्रचंड अव्यवस्था दिसून आली. Russia Ukraine War त्या तुलनेत भारतात तितकी हानी झाली नाही. गरिबांना त्या संकटकाळातही दोन वेळेला पोटभर अन्न मिळाले. कोणीही उपाशी झोपले नाही. भारतीय लसींनी तर कमालच केली. अनेक देशांना मदतीचा हात देऊन त्यांच्याकडील अकाली मृत्यूही टाळले.

Russia Ukraine War रशिया-युक्रेन युद्ध तर जगावर मोठी इष्टापत्ती बनून कोसळले. जिथे अमेरिकेसारख्या देशाला आणि संयुक्त राष्ट्र परिषदेलाही रशियासमोर हात टेकावे लागले, तिथे भारताने यशस्वी शिष्टाई करून युद्धाबाबत पुतिन यांचे वेळोवेळी कान टोचले. मोदींमुळे युक्रेनवरील अणुहल्ला टळल्याचे खुद्द अमेरिकेने नुकतेच रहस्योद्घाटन केले. या आणि अशा अनेक उदाहरणांवरून भारताचे जगातील एक मानाचे स्थान किती पक्के झाले, हे लक्षात येईल. Russia Ukraine War अर्थात, याचे श्रेय आपले महानायक पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. त्यामुळेच तर भारत दौ-यावर आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींचा गौरव करत, जगातील सर्वात लाडके नेते, असे म्हटले. Russia Ukraine War रायसीना संवादासाठी मेलोनींसह १०० देशांचे प्रतिनिधी सध्या भारतात आहेत. इतक्या देशांच्या प्रतिनिधींसमोर मेलोनी यांनी मोदींचा केलेला उल्लेख जितका गौरवास्पद आहे, तितकाच सार्थही आहे. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारचा आलेख कायम चढताच राहिला आहे. Russia Ukraine War त्यांनी विरोधकांना बोट ठेवायला जागाच उरणार नाही, अशी कामगिरी केली आहे.

मग काहीच मिळाले नाही म्हणून उद्योगपतींशी साटेलोटे या विषयावरूनच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. त्यातही गौतम अदानींविषयी हिंडेनबर्ग अहवालाने वातावरण तापविण्यात आले. Russia Ukraine War एखादा उद्योगपती इतक्या कमी कालावधीत इतकी संपत्ती कशी निर्माण करतो, इतके मोठे साम्राज्य कसे उभारू शकतो, असे प्रश्न उपस्थित करून अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस या महाशयांनी या प्रकरणाला आणखी भडकवण्याचा प्रयत्न केला. या सोरोस महोदयांचाही इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी खरपूस समाचार घेतला. Russia Ukraine War मोदींना अदानी प्रकरण भारी पडणार, असे म्हणणारे सोरोस यांची वैचारिक पातळी जगाला दाखवून देत मेलोनी यांनी मोदींच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक पैलू जागतिक समुदायासमोर आणले.

Russia Ukraine War जेव्हा एखादा समीक्षक, टीकाकार किंवा अगदी विचारवंतदेखील बोलतो तेव्हा त्याचे मत पूर्वग्रहदूषित असू शकते. त्यांचे मत प्रभावित केले जाऊ शकते. मात्र, एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने स्वत:हून दुस-या देशाच्या पंतप्रधानांविषयी जागतिक व्यासपीठावर गौरवोद्गार काढणे, ही फार मोठी बाब आहे. Russia Ukraine War अर्थात, मोदी कधीही स्तुती-निदेंने प्रभावित होणारे नेते नाहीत. ते आपले काम करतात आणि केल्यानंतरच बोलतात. जागतिक समुदायाने त्यांच्या मुत्सद्देगिरीचा प्रत्यय वारंवार घेतला आहे. इन्स्टाग्राम, ट्विटर, वेगवेगळे सर्वेक्षण यात मोदी कायम आघाडीचे जागतिक नेते म्हणून गणले गेले. आता मेलोनी यांच्या वक्तव्यानंतर जगाला मोदींच्या लोकप्रियतेचा नव्याने प्रत्यय आला असावा. Russia Ukraine War विशेषत: त्यांच्या विरोधकांनाही त्यांचे माहात्म्य पटलेच असावे. जॉर्जिया मेलोनी यांच्या वक्तव्याने मोदींच्या लोकप्रियतेला ‘चार चांद’ लागले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. Russia Ukraine War कारण कोणी कितीही नाकारले तरी प्रतिभा, विद्वत्ता, बुद्धिमत्ता याचे महत्त्व मान्य करावेच लागते. म्हणतात ना…‘कोंबडे झाकल्याने तांबडे फुटायचे राहत नाही’ हेच खरे !