अमळनेर : येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती.
यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे,अनंतकुमार सुर्यवंशी, जागृती प्रभाकर,सुरेखा देसले,बबिता चौधरी, वैशाली साळवे,दिलवरसिंग पाटील,प्रशांत पवार,वैशाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
तर चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात जमणारा भक्तांचा मेळा, तिथे होणारा विठू नामाचा गजर, तिथल्या उत्साह आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती चोपडेकरांनी घेतली. येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातर्फे भव्य समता दिंडी, श्री गोवर्धन पालखी व त्यानिमित्त डोळ्याचे पारणे फिटतील अशा चोपड्यात पहिल्यांदाच रंगलेल्या रिंगण सोहळ्याचा अनुभव हजारो आबालवृद्धांनी घेतला. ‘…. स्वर्गी नाही असा सोहळा’ या उक्तीची प्रचिती चोपडेकरांना या निमित्ताने आली.