डाव्होस : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसमधील परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
स्वित्झर्लंड येथील डाव्होस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. pic.twitter.com/sS6L0YIyPH
— Uday Samant (@samant_uday) January 16, 2023
यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
१. Greenko energy Projects Pvt.Ltd १२००० कोटींची गुंतवणूक
२. Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक
३. ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक
४. Rukhi foods ४८० कोटींची गुंतवणूक
५. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक