Dawood Ibrahim Poisoning Rumors
भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #dawoodibrahim ट्रेंड होत आहे. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले असून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली आहे. दाऊदसंदर्भात सरकारी यंत्रणाकडून अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.
सोशल मीडियावर रविवारी रात्री #DawoodIbrahim #karachi हे hashtag ट्रेंडिगमध्ये आले. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उजव्या विचारधारेच्या युजर्सनी पाकिस्तानातून मोठी बातमी अशा आशयाची पोस्ट केल्याने चर्चेला जोर आला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, दिल्लीतील काही पत्रकारांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानातील माध्यमे, सरकारी यंत्रणा यांच्याकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.