शेतकऱ्यांनो, लक्ष द्या ! ‘या’ नोंदणीसाठी उरले फक्त दोन दिवस

#image_title

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘या’ पायरीवरून मी गाडीत चढू कसा ? एसटी चालकाचा व्हिडीओ व्हायरल 

या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरून पिकांचा विमा काढण्याची संधी मिळते, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते.

नोंदणी कशी कराल ?  

केसीसी कार्डधारक बँकेत जाऊन नोंदणी करू शकतात.
ऑनलाइन नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट: pmfby.gov.in

रब्बी पीक विम्यासाठी नोंदणी : फार्म नोंदणी लिंक

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी किसान कृषी रक्षक पोर्टलला भेट द्यावी किंवा हेल्पलाइन क्रमांक 14447 वर कॉल करावा. त्याचप्रमाणे, व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक 7065514447 वर मेसेज पाठवून देखील त्यांना आवश्यक माहिती मिळवता येईल. तरी, शेतकऱ्यांनी 15 जानेवारीच्या आत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.