Adi Dave : भारतीय क्रिकेट संघाने पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. आता येत्या सहा डिसेंबरपासून ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. अशातच क्रिकेट चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटर लेफ्ट आर्म स्पिनर आदि डेव्ह (23) याचा मृत्यू झाला आहे. आदि डेव्हच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या खेळाडूचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. आदि डेव्ह याने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांसह सामने खेळले आहेत.
डार्विन क्रिकेट क्लबने आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली की त्यांचा खेळाडू आदि डेव्ह आता या जगात नाहीय. आदि डेव्ह हा अष्टपैलू खेळाडू होता. तो त्याच्या डाव्या हाताच्या फिरकीसाठी प्रसिद्ध होता. हा खेळाडू वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सन 2017 मध्ये, डार्विनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या संघादरम्यान एक आंतर-संघ सामना खेळला गेला ज्यामध्ये आदि डेव्हला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिल ह्यूज याचा डोक्याला चेंडू लागल्याने 27 नोव्हेंबर 2014 रोजी मृत्यू झाला होता. बाऊन्सर असलेल्या शॉन ॲबॉटचा चेंडू सोडत असताना तो चेंडू फिल ह्युजेसच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला, त्यानंतर तो कोमात गेला. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. आता ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटर लेफ्ट आर्म स्पिनर आदि डेव्ह याचा मृत्यू झाल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.