---Advertisement---

मोठी बातमी ! नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

---Advertisement---

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत, माध्यमांवर याबाबतची माहिती समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील महिन्याभरापूर्वी त्यांना धमकीचे फोन आले होते. आज त्यांच्या संपर्क कार्यालयात पुन्हा दोनदा असे फोन कॉल्स आले.

मंगळवारी सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले.

या फोननंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तात्कळ पोलिसांना दिली. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या विषयाला दुजोरा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment