पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा त्यांना बॉम्बने उडवून देऊ आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ठार मारू, असे म्हटले आहे. डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.
मध्ये नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही घडामोडी सुरु आहेत. यातच नितीश कुमार यांना जीवे ठार मारण्याची धमकी यांना धमकी आली आहे. यावर, बिहार पोलिसांनीही तातडीने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकात छापेमारी करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री उशिरा आरोपीसह पाटणा येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने जेडीयू आणि भाजपामधील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. यानुसार, जेडीयूचे डॉ.संजीव, विमा भारती आणि दिलीप राय यांच्यातील नाराजी सर्वश्रुत झाला आहे. याशिवाय, इतर अनेक आमदारांनीही नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. त्यात गोपाल मंडल, मनोज यादव असे आमदारही आहेत. तसेच रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव यांची बंडखोरी सुद्धा बिहार भाजपामध्ये दिसून आली.