Death threats: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ई-मेलद्वारे शमीला ही धमकी देण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी त्याला एक धमकीचा ई-मेल आला, ज्यामध्ये त्याला एक कोटी रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.मोहम्मद शमीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद हसीबने सोमवारी उत्तर प्रदेशचे अमरोहा एसपी अमित कुमार आनंद यांची भेट घेतली आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, ४ मे रोजी मोहम्मद शमीला एक ई-मेल आला होता. त्यानंतर आज (५ मे) दुसरा ई-मेल आला ज्यामध्ये १ कोटी रुपये न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद शमीच्या भावाच्या लेखी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.३४ वर्षीय मोहम्मद शमी चालू आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.