आता आदिवासी संघटनांचा सुरत-नागपूर महामार्गचं बंद करण्याचा निर्धार; काय आहेत मागण्या ?

नंदुरबार : ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची (TAC) बैठक घेण्यात यावी यासाठी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.  आंदोलनात अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता. काहींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

धरणे आंदोलनाचा आज १९ वा दिवस असताना प्रशासनाने आंदोलनाची शासन स्तरावर दखल घेतली नाही. १९ दिवस झाले असून नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन कश्या संदर्भात सुरू आहे. किती दिवसापासून सुरू आहे व कोण आंदोलन करीत आहे, याची माहिती देखील नसल्याने प्रशासन किती हलगर्जीपणा करत आहे हे यावरून दिसते.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ जुलै रोजी सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, नवापूर येथील हायवे ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठकीची लेखी तारीख ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) च्या बैठक घेण्यात यावी तसेच क्रमांक १ ते क्र. २१ मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक चर्चा घडवून मागण्या सोडविण्याची हमी देणेची लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे केली आहे.

या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले आहे. या निवेदनात जिल्हा परिषद सदस्य भरत गावित , के. टी. गावित , हिरामण पाडवी , विजय ठाकरे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत .