छ.संभाजीनगर : आम्ही युती म्हणून भाजपबरोबर गेलो.कोणालाही फसवलं नाही. युतीत लढायचं आणि स्वत:च्या मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करायची, असे आम्ही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केल्याने आमदार, खासदार सोडून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण टीकू शकतो का? याचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर लगावला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान विरोधकांची इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. यामध्ये चर्चा सुरु आहे की, उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष त्याकडे दिलं पाहिजे. मतदारसंघाची निवड करत लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण टीकू शकतो का? याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे.