पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान, या निकालाचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले आहेत.
गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
निकाला नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, आम्ही या पराभवाचे आत्मचिंतन करू, मात्र तुम्हाला देखील आत्मचिंतन करावं लागणार आहे तिन राज्यांच्या निवडणूका झाल्या काँग्रेस कुठे दिसतच नाहीये, त्यामुळे थोडं आत्मचिंतन नाना पटोले तुम्ही करा थोड आम्ही करू” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी विधान भवनात दिली आहे.