नवी दिल्ली : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंग यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. सिंग यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून ते यासाठी घरीच उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
राजनाथ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत दिली आहे. सिंग ट्वीटमध्ये म्हणाले की ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत आणि मी होम क्वारंटाइन आहे. ‘अलीकडील काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात राहावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे.