---Advertisement---

Delhi Election Results 2025 Update : कोंडलीत ‘आप’चा झेंडा, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

---Advertisement---

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पहिला निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागला आहे. कोंडली मतदारसंघातून ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार यांनी विजय मिळवला आहे. मात्र, एकंदरित निकालांचे कल पाहता भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष केवळ 24 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोंडली मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयी उमेदवार कुलदीप कुमार यांनी जनतेचे आभार मानत “ही विजयाची सुरुवात आहे, दिल्ली पुन्हा एकदा केजरीवालजींवर विश्वास टाकेल”, असे वक्तव्य केले.

भाजपने यंदा दिल्लीतील निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे. पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. एकंदरित कल पाहता भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

दिल्लीच्या सत्तेचा अंतिम फैसला लवकरच

दिल्लीतील अंतिम निकाल काही तासांत स्पष्ट होतील. कोंडलीत आपच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी, एकंदर कल पाहता दिल्लीच्या सत्तेचा मुकुट भाजपच्या बाजूने झुकतो आहे, असेच चित्र दिसत आहे.

 भाजप ४० अन् आप ३०, काँग्रेसचा सुपडासाफ

दिल्लीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवत आम आदमी पार्टीचा (आप) पराभव केला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर भाजपला राजधानीत सत्ता मिळाली असून, अरविंद केजरीवाल यांचे १० वर्षांचे राज्य संपुष्टात आले आहे. या पराभवामुळे इंडिया आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आपसोबत युती न केल्यानेच हा पराभव झाल्याचा आरोप आता इंडिया आघाडीतून होऊ लागला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, भाजपने ४० जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टी ३० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा पूर्णपणे सुपडासाफ झाल्याचे दिसत आहे. यामुळे दिल्लीतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत.

उमर अब्दुल्लांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाभारत मालिकेतील एक व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “अजूनही लढा आपआपसात” असे म्हणत त्यांनी आप आणि काँग्रेसच्या स्वतंत्र लढतीवर नाराजी व्यक्त केली. हरियाणातही काँग्रेस आणि आपने वेगवेगळ्या लढती केल्या होत्या, त्याचाच फटका दोन्ही पक्षांना बसला आणि भाजपला सत्ता मिळाली, असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीत फूट?

काँग्रेस आणि आप दोन्ही इंडिया आघाडीचे घटक असले तरी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगवेगळी रणनीती अवलंबली. याचाच फायदा भाजपला मिळाला. काँग्रेसने आपची मते खाल्ल्यामुळेच आम आदमी पार्टीला सत्तेतून बाहेर जावे लागले, असा आरोप आप समर्थकांकडून केला जात आहे. यामुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

५ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये मतदान पार पडले होते. मतदानानंतर संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही एजन्सी वगळता बहुतांश सर्व्हेंमध्ये भाजप सरकार स्थापन करेल, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. हे अंदाज आता खरे ठरताना दिसत आहेत.

केजरीवाल यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

दिल्लीतील या पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या कारवायांमुळे आधीच अडचणीत असलेल्या केजरीवाल यांना आता पक्षांतर्गत टीकेलाही सामोरे जावे लागू शकते. पुढील काही दिवसांत आम आदमी पार्टीच्या भविष्यासाठी मोठे निर्णय घेतले जातील, अशी शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment