नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीमध्ये सत्तापासून दूर असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी यंदा विजयाची सुवर्णसंधी असल्याचे मतदानोत्तर कल चाचण्यांमधून समोर आले आहे.
५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला ४३ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, तर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला २६ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेससाठी एक्झिट पोलने निराशाजनक चित्र दाखवले आहे.
गेल्या दहा वर्षांत भाजपने लोकसभा निवडणुकीत बहुमत जिंकले आहे, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांचे ‘आप’चं वर्चस्व कायम राहिलं होतं. २०१२ मध्ये केजरीवाल यांनी ‘आप’ची स्थापना केली आणि २०१५ पासून दिल्लीत त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. २०२० मध्ये ‘आप’ने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला होता.
अशा परिस्थितीत, जर भाजप दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापन करू शकला, तर त्याचे मनोधैर्य प्रचंड वाढेल. त्याचबरोबर राज्यसभेमध्येही भाजपला मोठा फायदा होईल. दिल्ली विधानसभा मध्ये एकूण ७० जागा आहेत आणि बहुमतासाठी ३६ आमदारांची आवश्यकता आहे.
दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीमध्ये सत्तापासून दूर असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी यंदा विजयाची सुवर्णसंधी असल्याचे मतदानोत्तर कल चाचण्यांमधून समोर आले आहे.