तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। काहीजणांना मेथीची भाजी आवडत नाही. मग अशावेळी तुम्ही मेथीपासून बनवले जाणारे मेथीफळे बनवू शकतात. पौष्टिक आणि घरी बनवायला सोप्पे असे मेथीफळे हे घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
मेथीच्या लहान जुड्या कणीक, डाळीचं पीठ,तिखट, जिरे पूड, हळद, हिंग, मीठ, तेल, मोहरी-हिंग
कृती
सर्वप्रथम कणीक, डाळीचं पीठ, तिखट-मीठ-हळद-हिंग-जिरेपूड एकत्र करून घ्या. त्यात पाणी घालून नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेसारखी भिजवा. मेथी स्वच्छ धुवून पंचावर पसरून पूर्णपणे कोरडी होऊ द्या. नंतर ती बारीक चिरा. त्यातही चवीनुसार तिखट, मीठ घाला. कणकेची मोठी पोळी लाटून लहान वाटीनं त्याची पु-यासारखी फळं कापा. अशी सगळी फळं करून घ्या. नॉनस्टिक कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करा. नेहमीसारखी फोडणी करा. त्यावर मेथीचा एक थर द्या. त्या थरावर फळं लावा. परत मेथीचा थर द्या. परत फळं लावा. असे सगळे थर लावा. पॅनवर झाकण घाला. मध्यम आचेवर ३-४ मिनिटं शिजू द्या. झाकण काढून नीट हलवा. परत झाकण घाला. फळं शिजत आली की झाकण काढा. नंतर मधूनमधून हलवत फळं चांगली खरपूस लालसर होऊ द्या. सगळ्या बाजूंनी लाल झाली की गॅस बंद करा. मेथीफळं तयार आहेत. खायला देताना वरून साजूक तूप घालून द्या.