स्वादिष्ट अशी चॉकलेट बर्फी; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रूवारी २०२३। चॉकलेट तर लहान मुलांचे फेव्हरेट असतात. चॉकलेट पासून बनणारे चॉकलेट केक, चॉकलेट शेक, चॉकलेट आईसक्रीम हे सगळेच पदार्थ लहान मुलांना आवडतात पण या पदार्थांव्यतिरिक्त तुम्ही चॉकलेट बर्फी सुद्धा ट्राय करू शकता. चॉकलेट बर्फी घरी बनवायला सुद्धा सोप्पी आहे. चॉकलेट बर्फी घरी कशी बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
खवा, साखर, मिल्क पावडर, पिठीसाखर, चॉकलेट सॉस, तूप

कृती
सर्वप्रथम खवा किसून घ्या. कढई खवा, चॉकलेट सॉस व साखर घालून ७ मिनिट मंद विस्तवावर आटवत ठेवा. मिश्रण सारखे हालवत रहा. मिश्रण आटत आले की विस्तव बंद करून मिश्रण ५ मिनिट बाजूला थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये मिल्क पावडर व पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. एका स्टेनलेस स्टीलच्या प्लेटला तूप लावून खव्याचे मिश्रण ओतून एक सारखे करून घ्या. मग दोन तास प्लेट झाकून बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून घ्या.