तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। श्रावण महिना सुरु झाला असून या महिन्यात उपवास केला जातो. पण उपवासाला सुद्धा काहीतरी वेगळा उपवासाचा पदार्थ खावासा वाटतो. पण वेगळं काय करावं हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही साबुदाणा वडा घरी तयार करू शकता. साबुदाणा वडा घरी बनवायला अतिशय सोप्पा आहे. चला तर पाहुयात साबुदाणा वडा रेसिपी.
साहित्य
बटाटे, मिरच्या, साबुदाणा, तेल, कोथिंबीर, शेंगदाण्यांचं कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर, सैंधव मीठ
कृती
सर्वप्रथम, बटाटे स्मॅश करून घ्या . आता एका बाऊलमध्ये किसलेल्या किंवा मॅश केलेल्या बटाट्यांसोबत साबुदाणा, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, २ ते ३ बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा मिरपूड, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचं कुट, चवीनुसार सैंधव मीठ घ्या आणि सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर हाताला थोडं तेल लावून मिश्रणाला वड्यांचा आकार द्या आणि सेट व्हायला ५ मिनिटे ते फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करुन वडे गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्या. तळलेल्या गरमा गरम वड्यांना कोथिंबीरीने गार्निशिंग करा. तयार झाले आहेत आपले स्वादिष्ट साबुदाणा वडे या गरमा गरम वड्यांचा तुम्ही सॉस, किंवा खोब-याच्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.