---Advertisement---

‘त्या’ विवाहीता मृत्यूप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी, करण्यात येणार रास्ता रोको

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : भुसावळच्या वांजोळा येथील दीपाली चेतन तायडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शवविच्छेदन अहवाल मयत दीपाली तायडे यांचे वडील विनोद सोनवणे (रा. भादली, ता. जळगाव) आणि पोलिस प्रशासनाला त्वरित मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया संविधान महात्मा आर्मीच्या वतीने मोर्चा पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे, अशी माहिती जगन गांधी सोनवणे यांनी दिली.

मद्यसाठा घेऊन जाणारा चालकच ‘तर्राट’

जळगाव : खामगाव येथे मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या चालकाने भर चौकात रस्त्यातच ट्रक उभा केल्याने वाहतुकीला अडथळा झाला. त्यावेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले असता चालक विशाल मदन वाघ (रा. जालना) हा मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी त्याच्यावर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली.

सदर ट्रक वाहतूक शाखेत नेण्यात आला. ही कारवाई सोमवारी (२८ जुलै) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इच्छादेवी चौकात करण्यात आली. विशाल वाघ हा नाशिक येथून एका ट्रकमध्ये (क्र. एमएच १५, ईजी ६२५३) मद्यसाठा घेऊन खामगावकडे जात होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---