मराठा आरक्षणानंतर मुस्लिम आरक्षणाची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता मुस्लिम आरक्षणाची मागणी पुढे येताना दिसत आहे. या मागणीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली.

मुस्लिम समजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निर्णय कोर्टाने दिलेला असून हे सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळे याप्रकरणी शरद पवारांनी हस्तक्षेप करावा, ही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. वास्तविक मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. तरी देखील हे सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळे याप्रकरणी शरद पवारांनी हस्तक्षेप करावा, ही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

एमआयएमची देखील आरक्षण देण्याची मागणी

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने देखील करण्यात आली आहे. एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पत्रकार परिषदेत तशी मागणी केली आहे. न्यायालयाने निकाल दिलेला असताना देखील सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देत नसल्याचा आरोप एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे.

ओबीसी एकजुटीची तयारी

राज्यात मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याची शक्यता असल्याने ओबीसी समाजात चिंता आहे. दरम्यान, ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोध करत ओबीसी एकजुटीची तयारी सुरु केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.