---Advertisement---

Kolhapur Crime News : व्याजासाठी शरीरसुखाची मागणी, दारू पाजून महिलेवर वारंवार अत्याचार!

---Advertisement---

कोल्हापूर । कोल्हापूर शहरात व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) याला अटक केली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २०१४ मध्ये आर्थिक अडचणीमुळे रामा जानकरकडून दहा टक्के व्याजदराने ७०,००० रुपये घेतले होते. काही काळानंतर व्याज फेडण्यात अक्षम ठरलेल्या पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत जानकरने तिच्यावर जबरदस्ती केली.

तो तिला वेळोवेळी धमक्या देत राहिला. त्याने पीडित महिलेला मद्य पाजून बेशुद्ध करून तिचे अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण केले. यानंतर या छायाचित्रांचा वापर करून तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करू लागला. नातेवाईकांना हे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.

व्याज थकवल्याने जानकर याने पीडितेचे घरही बळजबरीने आपल्या नावे करून घेतले. जबरदस्तीने तिच्याकडून तीन लाख रुपयांचे घर लिहून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसंच व्याजासह मूळ रक्कम परत दे किंवा शारीरिक संबंध ठेव, असा तगादा लावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रामा जानकरला अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव अधिक तपास करत आहेत.

अनधिकृत सावकारीचा प्रकार उजेडात

जानकर हा कोणत्याही अधिकृत यादीत नोंद नसलेल्या खासगी सावकारांपैकी एक असून, तो अनेकांना अवैधपणे व्याजाने पैसे देत होता. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, तो लोकांना दमदाटी करून बळजबरीने कोऱ्या धनादेशांवर आणि स्टॅम्पपेपरवर सह्या घेत असे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment