---Advertisement---
भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागातील रेल्वेच्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजीच्या देवळाली-भुसावळ एक्सप्रेस आणि इगतपुरी -भुसावळ मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जळगाव – मनमाड विभागात तिसरी व चौथा रेल्वे मार्ग तसेच लाँग हॉल लूप मार्गाच्या अनुषंगाने नांदगाव स्थानकात यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कमिशनिंग करण्यात येत आहे. यासाठी प्रि-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामे हाती घेण्यात आली आहेत.
यासाठी विशेष ट्राफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी ७ व ८ रोजीची गाडी क्र. ११११३ देवळाली भुसावळ एक्सप्रेस आणि क्र. ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस या गाड्या तसेच ७ व ८ रोजीची क्र. ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू व क्र. १११२० भुसावळ -इगतपुरी मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ९ रोजी काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
९ रोजी गाड्याचे वेळापत्रक बदल
यात क्र. १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:५५ वाजेऐवजी १०:२५ वाजता (२.३० तास उशिराने) सुटेल. क्र. २२३१२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८:०५ वाजेऐवजी १०:०५ वाजता (२ तास उशिराने) सुटेल. तसेच क्र. १२५३४ मुंबई-लखनऊ एक्सप्रेस मुंबई येथून ०८:२५ वाजता सुटण्याऐवजी १०:२५ वाजता (२ तास उशिराने) सुटेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.









