Vande Bharat Express : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत एक्सप्रेसचे सारथी ? काय आहे गुपित वाचा….

Vande Bharat Express : आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत एक्सप्रेसच्या चालक सीटावर बसलेले होते . त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या एक्सप्रेसचे सारथ्य करणार की काय अशी चर्चा होऊ लागली. पण ..

 


त्यांनी चालकांशी चर्चा करत माहीती घेतली . नंतर ते प्रवासी डब्यात बसले . याच रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केला.  छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार हरीभाऊ बागडे,प्रशांत बंब, संजय सिरसाट उपस्थित होते.

मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशासाठी मुंबई येथे जाण्यासाठी ही रेल्वेची जलद सोय उपलब्ध झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.