भुवसाळ : आपली विकासाची गाडी आहे. या विकासाच्या गाडीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे. त्याला वेगवेगळ्या पक्षाचे ढब्बे लागले आहेत. या डब्यांमध्ये दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्यांक, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे.
आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यामध्ये सामावून घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ म्हणून मोदीजींच्या इंजिन्सप्रमाणे पुढे जाते आहे. दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात माझी मुलगी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिना आहे. पण त्यांना माहित नाही इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो.
उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे. शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधांवर केली. तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे तुमच्याकरता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे.