मुंबई : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काहीशी तनातनी निर्माण झाली होती. पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य असल्याचेही अनेक नेत्यांनी म्हटले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत पडळकरांना फटकारले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्पर नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे,” अशा शब्दांत फडणवीसांनी पडळकर यांना समजावले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आहे.अशाप्रकारची विधाने करणे चुकीचे आहे. तीनही पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तीनही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. नेत्यांविषयी अशाप्रकारच्या भाषेचा बिलकूल उपयोग करू नये, असे माझे मत असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.