Devendra Fadnavis : भुसावळात फडणवीसांचं आगमन, सभास्थळी जंगी स्वागत

भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौक येथे सभा होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झाले असून, त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपचे जिल्ह्याध्यक्ष अमोल जावळे,  माजी खासदार एटी नाना पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, आर.पी.आय आठवले गटाचे राजू सूर्यवंशी यांच्यसह राष्ट्रवादी, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित आहेत.