Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीत एकही राष्ट्रीय नेता नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉस म्हणतात, असेही फडणवीसांनी सांगितले. भाजप महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष बैठकीत बोलताना फडणवीसांनी मविआच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजप हा आघाडीतील मोठा भाऊ आहे. हे सरकार तीन पक्षाचं असलं तरी भारतीय जनता पक्ष आपल्या धोरणापासून, ध्येयापासून दूर जाणार नाही. या दोन्ही पक्षांना आपण सोबत घेऊन जाऊन, या दोन्ही पक्षांना समजून घेऊ. भाजपला त्याग करावा लागेल. सगळ्यांनी मेहनत घेतली तर आपण यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडू. देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय. मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था ५व्या क्रमांकावर आहे.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आज मोदीजी कुठेही गेले तरी गर्दी असते. शरद पवार साहेबांचं केरळमध्ये भाषण ठेवलं तर कोण येणार? विरोधकांचा एकच संकल्प, तो म्हणजे मोदीजींचा विरोध करणे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहे. हे समोर आहेत, पण यांच्या पाठीशी एक शक्ती आहे, ज्या शक्तीला अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैश्यांवर हे लोक अराजकता आणू पाहात आहेत.” यांना चीन फंडींग करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
“आज जी 20 च्या माध्यमातून आपले पंतप्रधान पुढे चालत होते आणि बलाढ्य देशाचं लोक मागून चालत होते. आपल्या बाजूच्या देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. श्रीलंका, बांगलादेश या सर्व देशाना आपली मदत घ्यावी लागते. जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधान यांना बॉस म्हटलं जाते. मोदींजीनी जो भारत तयार केला त्याशिवाय आता कुणाचे चालणार नाही. म्हणून आपल्या पाठीशी सर्व उभे आहे. काही शक्ती यामुळे घाबरल्या आहेत. ही वाटचाल कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातील काही जण त्याला बळी पडत आहेत.” असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.