देवेंद्र फडणवीसांचा जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा होणार!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : २० जुलै रोजी खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ नागरिक मृत्युमुखी पडले आणि अजूनही बचावकार्य सुरू आहे. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला दुःख देणारी आहे. भाजप या दुर्घटनेतील बधितांसोबत आहे. इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचा उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन हे सर्व तिथे जाऊन आले. उपमुख्यमंत्री फडणवीस संपूर्ण दिवस मदत पोहोचविण्यात व्यस्त होते, अजितदादा मंत्रालयातून प्रशासकीय पातळीवर मदत करत होते. तिघांनी मिळून काम केलं. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याचा वाढदिवस बॅनरबाजी जाहिरातबाजी फलक आतिषबाजी न करता संपूर्ण महाराष्ट्रात सेवादिन म्हणून साजरा करणार आहे. अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजप महाराष्ट्रात 50 हजार रुग्णमित्र नेमणार…

सेवादिनात या संकटाला सामोरे जाण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी करणार आहोत. हे संकट दूर होईपर्यंत भाजपचे कार्यकर्ते कार्यरत असतील. नेत्रदान, रक्तदान शिबिर आणि आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प असेल. वृद्धाश्रमात भुकेळ्यांना अन्न देणार. 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या काळात राज्यात भाजप महाराष्ट्रात 50 हजार रुग्णमित्र 28 हजार ग्रामपंचायतीत अन शहरी भागात नेमण्यात येणार आहे.

उद्यापासून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार!

रात्री अपरात्री कधीही कुठल्याही रुग्णाला गरज पडली की त्यांना मदत पोहोचवण्यासाठी भाजपचे हे रुग्णमित्र काम करतील. उद्याचा सेवादिन पुराग्रस्तनाचे मदतकार्य आणि 50 हजार रुग्णमित्र देणार आहे.

यावेळी बावनकुळे यांनी बोलताना नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “त्यांच्या डोक्यात कायम राजकारण आहे म्हणून ते तेच करणार. आमच्या मनात अंत्योदयाचे विचार आहेत, दीनदयाळ उपाध्याय यांनी हा विचार आणि उद्देश आम्हाला दिला आहे. ज्यांना राजकारण दिसते त्यांना राजकारण लखलाभ. जिथं कुणीही पोहचू शकत नाही तिथं भाजपचे रुग्णमित्र पाठवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सेवा करण्याचे निश्चित केले आहे.”

“आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यरत असून रस्त्यावर काम करत आहेत. काँग्रेसने लोकांना कन्फ्युज केले. दुर्घटना व्हायला नाही पाहिजे. संपूर्ण राज्याचा मॅप तयार केला पाहिजे. मुख्यमंत्री रस्त्यावर आहेत, घटनास्थळी आहेत. काँग्रेसने राज्यातील अनेक गोष्ठीवर लक्ष देणे गरजेचे आहे. घटना झालीय त्या ठिकाणी काँग्रेसने जायला हवं.”

“नागपूर अधिवेशनापर्यंत किती राहतील माहित नाही. काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण आहे. कोण कुठे जाईल असा त्यांच्यात संभ्रम आहे. विरोधीपक्षातले चार पाच नेते एकत्र दिसत नाहीयेत. एकूणच विरोधी पक्षाची स्थिती वाईट आहे. आजपासून एक वर्षात कोण कुठे जाईल आणि कोण कुठे राहील असे संशयाचे वातावरण आहे. पुढच्या अधिवेशनापर्यत राहिलेल्या नेत्यांमध्ये किती तिकडे राहतील हे सांगता येत नाही. माझा कुणावरही डोळा नाही पण विरोधी पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यांच्यात कुणावर कुणाचा विश्वास राहिला नाही. विरोधीपक्ष नेता सरकारी पक्षात जातो हा इतिहास आहे.. म्हणून आधी ब्लड ग्रुप चेक करतील आणि मग विरोधीपक्ष नेता ते ठरवतील. मला तरी वाटत नाही एवढया लवकर ते विरोधी पक्ष नेता निवडतील.” अशी टीका यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.