‘देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री’, झळकले बॅनर, फडणवीस म्हणाले..

Politics Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देताना नागपूरच्या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे.

तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. खरंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल असे म्हणत आपली इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा व्यक्त करण्यापूर्वी अजित पवार हे भाजप सोबत जाणार अशाही चर्चा झाल्या होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी लागेल अशी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला होता. त्यामध्ये राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये 16 आमदारांना अपात्र केल्यास एकनाथ शिंदे हे देखील अपात्र होतील असा तर्क लावत संजय राऊत यांनी हा दावा केला होता.

संजय राऊत यांनी हा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याच दरम्यान अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा अफवा असल्याचं स्वतः अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतरही अजित पवार यांचे त्यांच्या सासुरवाडीला बॅनर झळकले होते. त्याच दरम्यान आता नागपूर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केलेले बॅनर झळकले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देताना नागपूरच्या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.
ज्या कोणी लावले त्यांनी काढून टाकावेत, मुर्खपणा करु नये.
अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री असतील.
त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू.
कर्नाटकमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल.
मोदीजींचा प्रभाव संपूर्ण देशात आहे.
आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करतायत, हे लोकांना माहिती आहे
डबल इंजिनचं सरकार येथे पुन्हा चांगलं काम करेल.
भाजपने वेळोवेळी एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवलेले आहेत.