मुंबई : ”माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा अडीच वर्षांचा कारभार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे नेमकं फडतूस कोण आहे हे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित आहे. तुमच्या काळात दोन मंत्री कारागृहात जाऊनही त्यांचा राजीनामा न घेता त्यांची लाळ घोटणाऱ्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करायचे आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची पाठराखण करायचे हे महाराष्ट्राने पहिले आहे. त्यामुळे गुन्हेगारांची आणि खंडणीखोर वाझेची लाळ घोटणाऱ्यांना माझ्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खडसावले आहे.
भाजप कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि इतर विषयांवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांनी खास आपल्या नागपुरी शैलीतून सुनावले आहे. ठाकरेंनी माझ्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला असला तरी मी तसे बोलणार नाही. वास्तविक मी त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या भाषेचा वापर करून त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो पण ती माझी पद्धत नाही, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना राजकीय शिष्टाचारही शिकवला आहे.
तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल
फडणवीस म्हणाले की, ”अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरात बसून कारभार करणाऱ्या माणसाने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही संयमाने राजकारण करणारे लोक आहोत, तेव्हा त्यांनीही आमच्याशी संयमानेच बोलावे. सत्ता आणि पक्ष हातातून गेल्यामुळे त्यांचा थयथयाट होत असून त्याला उत्तर देण्याची काहीही आवश्यकता नाही असे मला वाटते. त्यामुळे आम्ही जर तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल,” असा गर्भित इशाराही फडणवीसांनी ठाकरेंना दिला आहे.

खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे !
ठाकरेंनी वापरलेल्या फडतूस शब्दावरून फडणवीसांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ”तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवडणुक जिंकता आणि केवळ खुर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटता हे राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे.”

माझ्या गृहमंत्री पदामुळे अनेकांचे देव पाण्यात !
”मी पाच वर्षे या राज्याचा गृहमंत्री राहिलेलो आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्येही गृहमंत्रालय सांभाळत आहे. मी राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे अनेकांची अडचण होत आहे हे मला माहित आहे. माझे गृहमंत्री पद कधी जाईल यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असले तरी हे गृहमंत्री पद मला तुमच्यामुळे मेहरबानीने मिळालेले नसल्याने ते मी सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. जी मंडळी या राज्यात चुकीच्या गोष्टी करतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही,” असा गर्भित इशारा फडणवीसांनी महाविकास आघाडीला दिला आहे.