मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी-विरोधकांच्या सत्तासंघर्षामुळे गाजला. मात्र अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीची चर्चाही विधीमंडळासह सोशल मीडियावर चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत येत असतांना पाऊस पडत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी छत्री हातात धरली होती त्यावेळी चालत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पायातले बूट काढून हातात घेतले. बूट हातात घेऊन अनवाणी पायाने देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पोहचले.
बूट पाण्यात भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचं चांगलंच कौतुक होतं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी इन्सपायरिंग असा शब्द लिहिला आहे. त्यानंतर त्यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनीही हाच फोटो ट्वीट केला आहे. भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा हा साधेपणा भावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे असं म्हणत काही नेटकऱ्यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे.
Inspiring !! pic.twitter.com/gRnavkAQrI
— nitesh rane (@NiteshNRane) July 17, 2023
आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जेव्हा नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच आक्षेप घेतला गेला तेव्हा पॉईंट ऑफर ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. तसंच विधानसभेतही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाताले मुत्सदी नेते म्हणून ओळखले जातात. अशात आता त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होताना दिसते आहे.
नेता ‘संघ’ संस्कारांचा !@RSSorg स्वयंसेवक @Dev_Fadnavis pic.twitter.com/kVWCisSnDU
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) July 17, 2023