तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३। पनीर कढाई, पनीर मसाला अशी काही भाज्यांची नावं काढली तरी तोंडाला पाणी सुटतं. पनीर सर्वांचं आवडीचं आहे. पनीर चे वेगवेगळे पदार्थ सुद्धा खावेसे वाटतात. पनीर पासून बनणारी पनीर कढाई ही भाजी घरी बनवायला सुद्धा सोप्पी आहे. पनीर कढाई घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पनीर, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, धने, जीरे, तेजपान, काळे मिरे, बडिशेप, कसूरी मेथी, आमचूर पावडर, अद्रक लसून पेस्ट, सिमला मिरची, चवीनुसार तिखट आणि मीठ
कृती
सर्वप्रथम मसाला तयार करण्यासाठी तेजपान, बडिशेप, जीरे, धने, कसूरी मेथी, काळे मिरे हे सगळे कढईत घेऊन चांगले भाजून घ्या. थंड झाल्यानंतर हा मसाला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यानंतर एका कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
त्यानंतर त्यात एक टेबलस्पून अद्रक- लसूण पेस्ट टाका. अद्रक लसूण पेस्ट परतून झाली की त्यात टोमॅटोची प्यूरी करून टाका.नंतर यात हळद, आमचूर पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट आणि या ग्रेव्हीपुरते थोडे मीठ टाका.
तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही चांगली परतून घ्या. यानंतर एका कढईत बटर टाका आणि पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्या. यानंतर याच कढईत चौकोनी आकारात कापलेले कांद्याचे आणि सिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे टाका आणि ते परतून घ्या. कांदा आणि सिमला मिरचीमध्ये थोडेसे मीठ आणि आपण तयार केलेला कढाई मसाला टाका. यानंतर आपण दुसऱ्य कढईत जी ग्रेव्ही केली आहे, त्यामध्ये पनीरचेे तुकडे आणि सिमला मिरची, कांद्याचे तुकडे टाका.