ढाका – गुलिस्तान भागात मंएका इमारतीत भीषण स्फोट , 16 ठार; 120 हून अधिक जखमी

 

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : ढाका येथील गुलिस्तान भागात मंएका इमारतीत झालेल्या स्फोटात 16 जण ठार तर 120 हून अधिक जखमी झाले.

आतापर्यंत 14 मृतदेह आणि 100 हून अधिक जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. गुलिस्तान बीआरटीसी बस काउंटरच्या दक्षिणेकडील पाच मजली इमारत, तसेच तळमजल्यावरील एक सॅनिटरी दुकान, बँकेचे कार्यालय या स्फोटामुळे प्रभावित झाले, परंतु कोणतीही इमारत कोसळली नाही.,अग्निशमन दलाच्या सेवेशी संबंधित अधिकारी रशीद बिन खालिद यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या अकरा तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत.

अग्निशमन अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीआरटीसी बस काउंटरजवळ दुपारी 4.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक बच्चू मिया यांनी सांगितले की,आतापर्यंत 14 मृतदेह आणि 100 हून अधिक जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. स्फोटाचे कारण लगेच समजू शकले नाही. सिद्दीकी बाजारातील एका व्यावसायिक इमारतीत हा स्फोट झाला ज्यामध्ये अनेक कार्यालये आणि दुकाने आहेत.