---Advertisement---

मोठी बातमी; धोनी करणार चित्रपटाची निर्मिती

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यानं आपल्या कर्तृत्वानं क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारतीय क्रिकेट मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला धोनी आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत समोर येत आहे. एम. एस धोनीने ट्विट करत चाहत्यांना सरप्राईज दिले आहे एम एस धोनी हा आता लवकरच मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात 25 जानेवारी 2019 रोजी केली आहे.  आतापर्यंत महेंद्र सिंह धोनीने तीन शॉर्टफिल्म केल्या असून आता नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आता आपल्यासमोर चक्क निर्माता म्हणून येत आहे. एलजीएम : लेट्स गेट मॅरिड असे सिनेमाचे नाव असून या चित्रपटात तो निर्माता म्हणून काम करणार आहे.धोनीने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तमिळ चित्रपटाची निवड केली आहे.  हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धोनी एन्टरटेनमेंट’ने सोशल मीडियावर या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment