Dhule : अजमेरा महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

 Dhule :    मतदार जनजागृती कार्यक्रमांनुसार अण्णासाहेब रमेश अजमेरा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय,नगाव येथे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम  झाला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे,महापालिका उपायुक्त संगीता नांदुरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येत आहे.

 

यावेळी मास्टर ट्रेनर दिनेश सैदाणे यांनी औषध निर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्होटर हेल्पलाइन ॲपद्वारे नवीन नाव नोंदणी कशी करावी. मतदार यादीतील नाव वगळणे तसेच मतदार यादीत दुरुस्ती करणे. तसेच मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक बाबत तसेच व्होटर हेल्पलाईन ॲप विषयी माहिती दिली. यावेळी मतदार प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना येत्या लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले.