Dhule : धुळे जिल्ह्यासाठी तीन ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट उपलब्ध

Dhule : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट म्हणजे तात्पुरता निवारा टेन्टचे उद्धटन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण धुळे नितिन गावंडे यांच्या उपस्थित संपन्न झाले.

 

यावेळी तहसीलदार महसूल पंकज पवार, मनपा उपायुक्त मनपा, श्रीमती संगीता नांदूरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र एस. सोनावणे, SDRF सहाययक समादेशक बाबा पारस्कर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज मोहड, अग्निशमन अधिकारी अतुल पाटील, सार्वजनिक बांधकामविभागाचे राजेंद्र माळी, स्वयसेवक प्रतिनिधी ॲड. निखिल ठाकरे, होमगार्ड विभागाचे अधिकारी श्री. मराठे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शासनाकडून प्राप्त तात्पुरते निवारा टेन्टचे अग्निशमन कार्यालय, धुळे येथे निवासी उपजिल्हाधिकारी नितिनजी गावंडे यांच्या उपस्थितीत अग्निशमन कर्मचारी, SDRF धुळे, होमगार्ड , स्थानिक संस्था प्रतिनिधी, महापालिका,धुळे, नगरपरिषद, नगरपालिका शिरपूर, दोंडाईचा, साक्री येथील कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक यांना टेन्ट व फायर ब्लॅंकेट संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गावंडे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जागतीक पातळीवर व देशात आणि राज्यात अनेक प्रकारच्या नवनविन नैसर्गीक आपत्ती उद्भवत आहेत. तसेच नैसर्गीक आपत्तींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मग ती अतिवृष्टीच्या रुपात असतील, पुर-महापुर, विजा पडणे, उष्माघात, शित लहरी, कोरोना किंवा वादळांच्या रुपात असतील अशा अनेक आपत्ती प्रसंगी आपत्ती घडलेल्या ठिकाणी आपत्तीग्रस्त नागरीकांसाठी तात्काळ शोध व बचाव कार्य करणे त्यांना सदर आपत्तीतून सुखरुप बाहेर काढणे, जखमी किंवा आजारी व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविणे यासाठी तसेच बहुतेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत आपत्तीग्रस्त नागरीकांना तात्पूरते स्थलांतर करावे लागते.
त्यावेळी अशा नागरीकांना तात्पुरता निवारा किंवा शोध व बचाव पथक तसेच वैद्यकीय पथकास मदत कार्य करतांना तात्पुरता कॅंप म्हणून कापडी टेंन्टची उभारणी करावी लागते. त्या दृष्टीने जिल्ह्यातील संभाव्य आपत्ती मध्ये तात्काळ असा निवारा उभारता यावा यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई कडून इतर जिल्ह्यांसह धुळे जिल्ह्यास यापुर्वी 2 व आता नव्याने 3 Beamless Inflatable Tents (4 x 4 चे एकुण चार टेंन्ट व 10 x 5 चा एक टेंन्ट) असे एकुण 5 टेंन्ट आलेले आहेत.

हे टेंन्ट वजनाने हलके असल्यामुळे एका जागेवरून दुस-या जागेवर उचलुन नेण्यास सोईस्कर आहेत. तसेच अगदी 8 ते 10 मिनीटात हे टेंन्ट उभारले जातात. शिवाय हे टेंन्ट वाटर प्रुफ़ व फायर प्रुफ आहेत म्हणून अत्यंत उपयुक्त आहेत. यापुर्वी संबंधीत यंत्रणांना टेंन्ट उभारणीचे दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आज देखील नव्याने प्राप्त झालेल्या टेंन्ट उभारणी प्रशिक्षण ठेवण्यात आले होते.जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार हे प्रशिक्षण झाल्यानंतर यातील एक- एक टेंन्ट शिरपूर, एक दोंडाईचा व साक्री येथे नगरपालिका, नगरपंचायतीकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.