Dhule : शाहीरी बाणा, लावणीचा ठेका आणि हास्य कल्लाळाने गाजवला महासंस्कृती महोत्सव पहिला दिवस

Dhule :  शाहीरी बाणा, लावणीचा ठेका, शहनाई तबला जुगलबंदीसह, सांस्कृतिक नृत्य आणि हास्याच्या कल्लोळात महासंस्कृती महोत्सवाला अवघ्या धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धुळे महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपवनसरंक्षक नितीनकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपायुक्त संगीता नांदुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आर.के. शहनाई ग्रुप, धुळे  राकेश गुरव व सहकारी यांनी शास्त्रीय वाद्याची शहनाई तबला जुगलबंदी सादर केली. तर सांगलीचे शाहीर पृथ्वीराज माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेल्या पोवाड्याने, आकांक्षा कदम यांच्या लावणीच्या ठेक्यांवर प्रत्येक पावलाने प्रेक्षकांची मने जिंकली.

 

 

तर महाराष्ट्राची हास्यजत्रेत प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर, यांनी शोले पिक्चरावर सादर केलेल्या जय विरु भूमिका तर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवानी परब, पृथ्वी प्रताप, अभिजित कोसंबी, श्रावणी महाजन, आकांक्षा कदम, परेश दाभोळकर आणि गोकुळ पाटील यांच्या प्रहसनाच्या हास्याच्या कल्लोळाने अवघे धुळेकरांना मंत्रमुग्ध केलेत.