---Advertisement---

धुळे 52 तर नंदुरबार जिल्ह्यात 54 टक्के जलसाठा

---Advertisement---

धुळे : खानदेशात गत मॉन्सून दरम्यान सरासरीपेक्षा दमदार पावसामुळे सर्वच प्रकल्प ओसंडले होते. तसेच कालवा सल्लागार समिती व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार जळगाव तसेच धुळे जिल्ह्यात पाट कालव्याद्वारे आवर्तन देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात सद्य:स्थितीत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास उपयुक्त जलसाठा आहे. तर पश्चिम खानदेशात धुळे जिल्ह्यात 52 टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 54 टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

धुळे जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये सुरुवातीचे काही दिवस सोडले तर ऑगस्टपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे धुळे जिल्ह्यातील मध्यम 12 व 45 लघु प्रकल्प ओसंडले होते. सद्य:स्थितीत धुळे, नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश शहरी भागात मुबलक पाणीसाठा असून जिल्ह्यात टंचाई परिस्थिती कोणत्याही भागात नाही.

पांझरा- 43 टक्के, मालनगाव- 31, जामखेडी- 26, कनोली- 26, बुराई- 32, करवंद- 39, अनेर- 67, सोनवद- 21, अक्कलपाडा- 51, वाडीशेवाडी- 54, अमरावती- 64, सुलवाडे- 96 तर मुकटी- 69 आणि 45 लघु, अशा सर्व प्रकल्पांत सरासरी 52 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जामखेडी प्रकल्पात 26 टक्के जलसाठा असून डाव्या कालव्याद्वारे आणि सांडव्यावरून 30 क्यूसेकचे आवर्तन सुरू आहे. अक्कलपाडा प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे 55 क्यूसेक असे एकूण 110 क्यूसेक आवर्तन दिले जात आहे. गत वर्षी याच दिवशी धुळे जिल्ह्यातील प्रकल्पात 24 टक्के उपयुकत जलसाठा असल्याची नोंद होती.

नंदुरबार जिल्ह्यात 3 मध्यम आणि 6 लघु, अशा सर्व प्रकल्पात 54 टक्के समाधानकारक उपयुक्त जलसाठा आहे. यात रंगावली- 50 टक्के, सारंगखेडा- 54, प्रकाशा- 70, तर लघु प्रकल्पात 60 टक्के असा लघु व मध्यम प्रकल्पात एकूण 54 टक्के सरासरी उपयुक्त जलसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षी याच दिवशी सरासरी 34 टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment