---Advertisement---

Dhule Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच धुळ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ जून २०२४ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत धुळे तालुक्यातील नेर येथील संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच लग्न करण्यात नकार दिला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत देऊरचा तरुण ठार

धुळे : साक्री ते पिंपळनेर रोडवरील कासारे गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने समाधान प्रल्हाद माळी (वय ३०, रा. देऊर खुर्द, ता. धुळे) याला धडक दिली. अपघातानंतर त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालय व तेथून हिरे रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वादातून तरुणाला बेदम मारहाण

धुळे : देवपूरातील जीटीपी स्टॉप परिसरात फिर्यादी रोहित रविकांत सानप (वय २९ रा. देवपूर) यास दि. ७ रोजी रात्री अकराच्या सुमारास किरकोळ वादातून संशयित योगेश चव्हाण, उर्फ सोनू धोबी अविनाश चव्हाण उर्फ दादू धोबी, गिरीष रामदास मराठे, हरी गिरासे, मोनू कैलास सोनार (सर्व रा. नंगावबारी देवपूर, धुळे) यांनी शिवीगाळ करीत लोखंडी पाईपाने मारहाण करीत दुखापती केले. याप्रकरणी देवपूर पोलिसात वरील संशयितांविरूध्द गुन्हा झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment