Dhule : जिल्ह्यात होतोय लोककल्याणकारी योजनांचा जागर

Dhule :   भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र अद्याप ज्यांना लाभ मिळू न शकलेल्या पात्रताधारक व्यक्तिंपर्यंत केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ पोहोचावा म्हणून केंद्र शासनातर्फे धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयेाजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील गावात ही संकल्प यात्रा 22 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत जाणार आहे. तरी या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

शुक्रवार, दि.22 डिसेंबर, 2023 रोजी धुळे तालुक्यात  खंडलाय ब्रु. (सकाळ सत्र ), बांभुले प्र नेर (दुपार सत्र ) साक्री तालुक्यात देवजीपाडी, (सकाळ सत्र), नागझिरी (दुपार सत्र) शिंदखेडा तालुक्यात चांदगड (दुपार सत्र) तर शिरपूर येथे कुरखळी (सकाळ सत्र), सावळदे,बाभुळदे (दुपार सत्रात) येथे संकल्प यात्रेचे आयोजित केले आहे.

            शनिवार, दि.23 डिसेंबर, 2023  रोजी साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल (सकाळ सत्र ) आमखेल, मलांजन (दुपार सत्र ), शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा( दुपार सत्र ) तर शिरपूर येथे (सकाळ सत्रात) चिलारे येथे  संकल्प यात्रेचे नियेाजन केले आहे.

            रविवार, दि.24 डिसेंबर,2023 रोजी धुळे तालुक्यातील देऊर खु (दुपार सत्र ), साक्री तालुक्यातील भोरटीपाडा (सकाळ सत्र ), मावजीपाडा (दुपार सत्र ) शिंदखेडा तालुक्यात चिरणे (सकाळ सत्र ), कदाणे (दुपार सत्र ),तर शिरपूर येथे सकाळ सत्रात खामखेडा प्र.आ येथे संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

सोमवार, दि. 25 डिसेंबर, 2023 रोजी साक्री तालुक्यातील जेबापूर (सकाळ सत्र ) झंझाळे, विहीरगाव  (दुपार सत्र ), शिंदखेडा तालुक्यातल अलाणे, (सकाळ सत्र) तर परसामळ, चिरणे (दुपार सत्र ) तर शिरपूर तालुक्यातील हिवरखेडा येथे सकाळ सत्रात संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

मंगळवार, दि.26 डिसेंबर, 2023 रोजी धुळे तालुक्यातील पिंपरखेडा (सकाळ सत्र), लोहगड (दुपार सत्र), साक्री तालुक्यात लघडवाळ, रोहोण (सकाळ सत्र), संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

बुधवार, दि.27 डिसेंबर, 2023 रोजी धुळे तालुक्यातील लोणखेडी (सकाळ सत्र ), अकलाड (दुपार सत्र ) साक्री तालुक्यातील रांजणगाव,सातरपाडा (दुपार सत्र ) शिंदखेडा तालुक्यात (सकाळ सत्र) सुलवाडे तर शिरपूर तालुक्यातील हेद्रापाड (दुपार सत्रात) संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

गुरुवार, दि. 28 डिसेंबर, 2023 रोजी साक्री तालुक्यातील आमोडे (सकाळ सत्र ), खरडबारी, दापुर (दुपार सत्र ) शिंदखेडा तालुक्यात दलवाडे प्र.न (सकाळ सत्र ) तर वरुळ  दुपार सत्रात संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

शुक्रवार, 29 दि. डिसेंबर, 2023 रोजी साक्री तालुक्यातील मालनगाव, शेलबारी (दुपार सत्र), शिंदखेडा तालुक्यात चौगाव (सकाळ सत्र ), जोगशेलु (दुपार सत्र ), तर शिरपूर तालुक्यातील आमोदे (सकाळ सत्र ) अजंदे खु (दुपार सत्र ) संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

शनिवार, दि. 30 डिसेंबर,2023 रोजी धुळे तालुक्यातील वार (सकाळ सत्र ), सांजोरी (दुपारी सत्र ), शिंदखेडा तालुक्यातल रहिमपुर (सकाळ सत्र ) तर शिरपूर तालुक्यातील कळमसरे (सकाळ सत्र ),  मांडळ (दुपार सत्र ) संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

रविवार, दि.31 डिसेंबर, 2023 रोजी साक्री तालुक्यातील मैदाणे (सकाळ सत्र ) तर  शिरपूर तालुक्यातील हिंगोणीपाडा (दुपार सत्र ) संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे.

या यात्रेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.