Dhule Lok Sabha Election Results : धुळेमधून शोभा बच्छाव विजयी; डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव

Dhule Lok Sabha Election Results : धुळे लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे तर भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे याचा पराभव झाला आहे.

धुळे मतदारसंघ हा 48 मतदारसंघापैकी एक आहे. 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धुळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2019 मध्ये काँग्रेसनं उमेदवार बदलत कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. पण भामरेंच्या विरोधात त्यांना विजय मिळवता आला नाही.

सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. भाजपनं 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांनी अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकानं विजय मिळवला होता. त्यामुळं 2019 मध्येही पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली.

दरम्यान, २०२४ भाजपनं 20२४ च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली मात्र यावेळी त्यांच्या पदरी पराभव आला असून, महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे.