Dhule : शहरातील विविध प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, गटारी आदी विकासकामांसह पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. तुमचा खासदार म्हणून शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढेही विकासाचा हा वेग कायम राहील, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
शहरातील देवपूरमधील प्रभाग २ मधील भगतसिंग कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये बसविण्यात आलेल्या हायमास्ट लॅम्प व एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग २ मधील भगतसिंग कॉलनीसह परिसरातील विविध विकासकामांसाठी भाजपचे देवपूर पूर्व मंडळाध्यक्ष सुबोध पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा सतत पाठपुरावा सुरू असतो, असेही खासदार डॉ. भामरे यांनी नमूद केले.
यावेळी भाजपचे देवपूर पूर्व मंडळाचे अध्यक्ष सुबोध पाटील, भाजपचे उपाध्यक्ष संजय बोरसे, चिटणीस प्रथमेश गांधी, नंदू ठोंबरे, महेंद्र भामरे, कमलाकर पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, कल्पेश ठाकरे, विवेक चौधरी, प्रवीण भदाणे, पंकज चव्हाण, दर्शन भिडे, अभिषेक देवरे, राजेंद्र सोनार, रमेश पाटील, मंगेश कोळी, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, सुशील पाटील, अमर चौधरी, भूषण देसले, सागर कोळी, शांतिलाल देसले, गोकुळ साळुंखे, युवराज बोरसे, कृष्णा पाटील, राजेश लोहार, मनोहर लोहार, योगेश सैंदाणे, हेमंत लोणारी, जितेंद्र शिंदे, संदीप गुरव, छायाताई पाटील, रत्नाताई पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.