---Advertisement---

तृतीयपंथीवर चौघांकडून अत्याचार, विश्वास संपादन केला अन् सोबत नेले; पीडीतेने पोलिसांना सांगितली आपबिती

---Advertisement---

धुळे : देवपुरातील एका तृतीयपंथीवर चौघांनी लैंगिक अत्याचार करीत त्याची व्हिडीओ शूटिंगसह अंगावरील दीड लाखाचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच काढलेला व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देत पिडीत तृतीयपंथीकडून एक लाखाची खंडणी मागितल्याची घटना रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान चाळीसगाव चौफुलीजवळ घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा लैंगिक अत्यचारासह खंडणी असे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथी पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी दि. ४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चाळीसगांव रोड चौफुली महामार्गलगत असलेल्या एका ठिकाणी पीडीतेस संशयित चार तरुणांनी संगनमत करुन पीडीतेचा विश्वास संपादन करीत घेवून गेले. त्याठिकाणी नंतर पिडित तृतीयपंथीयावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ देखील तयार केले.

अंगावरील एक लाखांचे सोन्याचे दागिने हिसकविले

चौघांनी लैंगिक अत्याचार करीत त्याची मोबाईलमध्ये व्हिडओ काढले तसेच माराहाण केली. तसेच पीडीत तृतीयपंथीचे अंगावरील सुमारे १ लाख ४२ हजार किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. मारहाण करुन लैंगिक अत्याचाराचे काढलेले अश्लित व्हिडीओ सोशल मीडीयाद्वारे प्रसारीत करण्याची धमकी देवून पीडीतेकडून चौघांनी एक लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर ते चौघे तेथून निघून गेले.

पिडीत तृतीयपंथीने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन घाटले. पोलिसांना आपबिती सांगितली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला. दरम्यान, सोमवारी रात्री चाळीसगाव रोड परिसरातील संशयित तिघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment