Rligious Conversion in India गुरुवार, २२ जून २०२३ च्या नागपूर ‘तरुण भारत’मध्ये ‘इतस्ततः’ या सदराखाली माझा ‘धर्म सुधारणा की धर्मांतर’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला.
हा लेख वाचून काही लोकांनी आपल्या काही शंका उपस्थित केल्या. त्यापैकी एक मुद्दा हा की, धर्मांतर कदाचित मुस्लिम प्रश्नाची सोडवणूक करू शकेल; पण हे कसे घडवून आणायला हवं, हा खरोखर अवघड प्रश्न आहे. Religious Conversion in India त्यामुळेच कोणीही विचारवंत यावर भाष्य करताना दिसत नाही. या विषयावर चर्चा करणेदेखील टाळले जाते. हा विचार अवघड यासाठी आहे की, या मुद्याचा उल्लेख जरी केला तरी मुस्लिम समाजातील मुल्ला, मौलवी आणि मुखंड चवताळून अंगावर येतात. Religious Conversion in India लगेच फतवे निघतात. ‘सर तन से जुदा’चे नारे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी अमेरिका दौ-यावरून इजिप्तमध्ये असतानाच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा भारतातील मुसलमानांच्या सुरक्षिततेविषयी शंका घेणारे ट्विट करतात. आपण अध्यक्ष असताना किती ठिकाणी बॉम्बहल्ले केले, हे मात्र सोयीस्कररीत्या विसरून जातात. Religious Conversion in Indiaसगळेच प्रश्न अकारण संवेदनशीलतेच्या उच्चतम पातळीवर जातात. काहीही असले तरी मुस्लिम समाज हा आज जगाला डोकेदुखी झालेला आहे, हे मान्य करावेच लागते.
ज्या ज्या देशांनी अगदी नजीकच्या भूतकाळात या समाजाला आश्रय दिला त्या सर्व देशांसाठी आता मुस्लिम समाज आणि पर्यायाने इस्लाम ही अवघड समस्या झालेली आहे. कारण, निर्वासित म्हणून हे मुसलमान नेहमीच इतर धर्मीय देशांमध्ये आश्रय घेतात. त्यांचे दुःख आणि अगतिकता पाहून इतर धर्मीय देश आणि समाज त्यांना आश्रय देतात. हळूहळू यांची संख्या तेथे वाढू लागते. मग हळूच मशिदी उभारल्या जातात. त्या मशिदी लगत मुस्लिम वस्ती केली जाते. Religious Conversion in India या वस्तीत त्या देशाचा कायदा लागू न होता शरियाची अंमलबजावणी केली जाते. एकदा का तो देश मुस्लिमबहुल झाला की, तेथील भूमिपुत्रांनाच दुस-या देशात निर्वासित व्हावे लागते किंवा इस्लाम स्वीकारावा लागतो. त्यामुळे जगातील सर्व देशांना यावर उपाय शोधावे लागणार आहेत. जगातील सुदान, नॉर्वे, जपान, चीन, ब्रिटन, नेदरलँड्स या देशांनी इस्लामच्या विरोधात ठोस पावले उचलली आहेत. Religious Conversion in India अर्थात या बहुतेक देशांमध्ये इस्लाम निर्वासितांच्या मार्फत पोहोचला आहे, हे लक्षात घेण्याजोगे वेगळेपण आहे. इस्रायल या देशाचा अरब राष्ट्रांशी म्हणजेच इस्लामशी चालू असलेल्या संघर्षाला तर अनेक शतकांचा इतिहास आहे.
Religious Conversion in India भारताची परिस्थिती मात्र या सगळ्या देशांपेक्षा वेगळी आहे. मुस्लिम आक्रमकांनी भारत व्यापला याला, आता १५०० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. आम्ही ब्रिटिश जोखडातून स्वतंत्र होताना या मातृभूमीचे तुकडे पाडण्याची पापी किंमत या आधीच इस्लामला मोजली आहे. आता नव्याने इस्लाम केवळ या देशात नव्हे, तर जगात उत्पात माजवीत आहे. मुस्लिम समाजाच्या धारणा बदलणे अशक्य कोटीतील गोष्ट असल्याचे इतिहास आम्हाला सांगतो. दुर्दैवाने आमच्याच देशातील काही हिंदूंना हे दिसत नाही, ऐकू येत नाही, समजत नाही. Religious Conversion in India ते कोणत्या तरी अगम्य कारणांसाठी, या ना त्या प्रकारे इस्लामची पाठराखण करताना दिसतात. यात आमच्या मनात, आमच्या नकळत, शालेय जीवनापासून पेरला गेलेला साम्यवादी विचारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शालेय अभ्यासक्रमापासून आमच्या ‘दर्शनशास्त्रा’चा, ‘धर्मतत्त्वा’चा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. याद्वारे साम्यवादी आणि नास्तिक विचारांचा तसेच ख्रिस्ती व इस्लाम धर्मांचा जाहीर प्रतिवाद करणे सहज शक्य आहे.
तरी या सगळ्यांचा अभ्यास करून तो प्रथमतः केलाच पाहिजे, ही जाणीव सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. हिंदुत्वात ही क्षमता नक्कीच आहे, उजागर होण्याची गरज आहे. यासाठी आमच्या समाजात आपल्या धर्माचा, परंपरांचा, शास्त्रांचा अभिमान जागा करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या बाबींचा सामाजिक पातळीवरील अभ्यासाचा स्तर वाढविणे गरजेचे आहे. याकरिता ख-या अभ्यासू लोकांचा आदर्श हिंदू समाजापुढे ठेवला जाणे नितांत गरजेचे आहे. हे सगळं करणे म्हणजे आपलेच घर नीटपणे बांधून घेणे होय. हिंदू समाजाने हे तर केलेच पाहिजे. Religious Conversion in India मात्र, हिंदू समाजापुढील आव्हानांचा विचार केला, तर केवळ आपल्या हिंदू धर्म, संस्कृती यांचेच संरक्षण करणे पुरेसे ठरणार नाही. आपल्याला अधिक आक्रमक होणे क्रमप्राप्त आहे. एक म्हणजे अत्यंत काटेकोरपणे हिंदू समाजाने इतर धर्मीयांशी सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार टाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे समस्त हिंदूंनी मजारी वा दग्र्यांवर डोकं टेकवणे अगदी या क्षणापासून बंद केले पाहिजे. केवळ राजकीय विचार न करता सर्व हिंदूंनी सर्व राजकीय पक्षांवर दबाव टाकून धर्माच्या आधारावर आरक्षण रद्द करण्यासाठी बाध्य केले पाहिजे.
आरक्षण आणि सवलती फक्त हिंदू धर्मातील दुर्बल घटकांनाच लागू असतील, हे या देशातील जनतेला पुन्हा एकदा स्पष्टपणाने कळायला हवे. आज जगभरात मुस्लिम धर्म सोडून देणारे अनेक सुशिक्षित मुस्लिम आहेत. या मुस्लिम धर्माचा त्याग करणा-यांमध्ये प्रामुख्याने मुस्लिम स्त्रियांचा अंतर्भाव आहे. भारतातदेखील अनेक मुस्लिम मुली आणि स्त्रिया मुस्लिम धर्म सोडून देण्याचा विचार करतात. पण हा विचार त्यांना उघडपणाने मांडणे आज तरी अशक्य आहे. Religious Conversion in India कारण, इस्लाम हा एकेरी मार्ग असलेला धर्म आहे. इतर धर्मीय लोकांना आपल्या धर्मात आणनाऱ्याला इथे जन्नत मिळते, असे सांगितले जाते तर स्वधर्माचा त्याग करणाऱ्याला मात्र थेट मृत्युदंडाची शिक्षा सांगितली आहे. स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची जागा फक्त जहन्नममध्येच सांगितली आहे. अनेक मुस्लिम देशांमध्ये लागू असलेला शरिया, इथे भारतात जरी लागू नसला, तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी साधून, स्वधर्माचा त्याग करणाऱ्यावर त्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था या देशातील मुस्लिम समाजात आजही दुर्दैवाने अस्तित्वात आहे. Religious Conversion in India उत्तरप्रदेशमध्ये तिवारी, अमरावतीमध्ये उमेश कोल्हे तर हिमाचल प्रदेशात लालसिंग या हिंदूंच्या हत्या हेच दर्शवतात.
त्यामुळे समाजातील आणि कुटुंबातील दुय्यम स्थान डाचत असतानाही कुटुंबातील पुरुष सदस्यांकडून छळ, अन्याय आणि अपमानकारक वागणूक देण्यात येत असूनही, मुस्लिम स्त्रिया स्वधर्माचा उघडपणाने त्याग करताना दिसत नाहीत. अशा मुस्लिम स्त्री-पुरुषांच्या सुरक्षेची जबाबदारी हिंदू समाजाने घेतली तरच अनेक जण इस्लामचा त्याग करून हिंदू धर्मात परत येतील. अनेक मुस्लिम स्त्री-पुरुषांना इस्लामचे बंदिस्तपण डाचत असते. Religious Conversion in India हिंदू समाजात आणि हिंदू धर्मात असलेले उपासनेचे, विचारांचे स्वातंत्र्य आकर्षित करीत असते. स्त्रियांना हिंदू समाजात असलेला सन्मान त्यांना समजत असतो; त्याच वेळी स्वधर्माचा त्याग करून हिंदू धर्मात येणाऱ्यांना हिंदू समाज सर्वंकष सुरक्षा देण्याकडे दुर्लक्ष करतो, हेही दिसत असते. इस्लामचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या आर्थिक, सामाजिक, जैविक संरक्षणाची, त्यांना सन्मानाने जीवन जगवण्याची जबाबदारी हिंदू समाजाची, हिंदू धर्माची आहे, याची समस्त हिंदूंनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
प्रचंड आर्थिक, सामाजिक ताकद असलेल्या संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. Religious Conversion in India इथे आमच्या मंदिरांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना सन्मानाने वागवले गेले पाहिजे. यासाठी मंदिरांनी, कीर्तनकारांनी, कथाकार-प्रवचनकारांनी हिंदू समाजमन तयार केले पाहिजे. त्यांना हिंदू समाजातील चालीरीती, परंपरा याविषयी उद्बोधन केले पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल याची व्यवस्था केली गेली पाहिजे. इस्लामचा त्याग करून हिंदू होणाऱ्या प्रत्येकाला संरक्षण देण्यासाठी आवश्यक ते कार्यकर्ता प्रशिक्षण आणि व्यवस्था निर्माण करण्याची आज गरज आहे. Religious Conversion in India हा विश्वास आम्ही कसा देणार, यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था आम्ही कशी निर्माण करणार, यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची फळी आम्ही कशी उभी करणार, यावर विचार होणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हा विश्वास आम्ही इस्लामचा त्याग करणाऱ्या प्रत्येक माणसाला देऊ शकणार नाही, तोपर्यंत घरवापसी हे एक मृगजळच ठरेल.
– डॉ.विवेक राजे
९८८१२४२२२४