चोपडा : पित्यावर अंत्यसंस्कार करून विद्यार्थ्यानं पेपर दिल्याचं आपण सोशल मीडियावर वाचलं असेलच अशीच एक घटना चोपड्यात घडलीय. बारावीचा मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. या पेपरला पित्यावर अंत्यसंस्कार करून एका विद्यार्थ्यानं उपस्थिती लावली आणि मोठया जिद्दीनं पेपर दिला. या जिद्दी विद्यार्थ्याचं नाव आहे, दिग्विजय कमलेश पाटील.
येथील रहिवासी तथा पंचायत समिती रावेरचे वरिष्ठ लिपिक कमलेश पाटील यांचे २० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. २१ रोजी सकाळी १० वाजता चोपडा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत कमलेश पाटील यांचा लहान मुलगा दिग्विजय हा बारावीच्या वर्गात असून त्याचा मंगळवारी इंग्रजीचा म्हणजे, बारावीचा पहिला पेपर होता.
दरम्यान, वडील कमलेश पाटील यांचे २० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. २१ रोजी सकाळी १० वाजता चोपडा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दिग्विजय याने वडिलांच्या मृत्यूचे दुःख विसरून परीक्षा केंद्र गाठलं आणि मोठ्या जिद्दीनं पेपरही दिला.